प्रेमविवाहाच्या रागातून महिलेचा विनयभंग ; तिघांना केली मारहाण
molestation of a woman out of anger of love marriage ; Three were beaten जामनेर : तरुणाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून त्याच्या कुटुंबातील 42 वर्षीय आईचा विनयभंग करीत अन्य तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथे 11 फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी जामनेर पोलिसात सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेचा विनयभंग : तिघांना मारहाण
कापूसवाडी येथील 42 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून संशयित आरोपींनी शनिवार, 11 रोजी सायंकाळी सात वाजता घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करीत त्यांचा विनयभंग केला तसेच विजय जयसिंग राठोड, कर्तार विजय राठोड, विशाल विजय राठोड यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत आमच्या नांदी लागल्यास ठार मारू, अशी धमकी दिली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पंडित धीरसिंग राठोड, आदित्य धनसिंग राठोड, विजय धिरसिंग राठोड, धनसिंग धिरसिंग राठोड, कर्तार पंडित राठोड, किरण पंडित राठोड आणि ज्ञानेश्वर विजय राठोड (सर्व रा.कापूसवाडी, ता.जामनेर) यांच्या विरोधात शुक्रवारी जामनेर पोलिसात विनयभंग, दंगल आदी कमलान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जनार्दन सोनवणे करीत आहे.








