भुसावळात ढाब्याबाहेरून दुचाकीची चोरी


भुसावळ : शहरातील यावल रोडवरील हॉटेल कुणालबाहेरून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
गणेश दौलत फेगडे (श्रीनगर, जळगाव रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, सोमवार, 6 रोजी सायंकाळी सात ते नऊ दरम्यान चोरट्यांनी हॉटेल कुणाल बाहेरून 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 बी.व्ही.3190) लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक संदेश निकम करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !