ओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव इर्टीकाची दुचाकीला धडक : भुसावळातील तिघे तरुण जखमी
Speeding Ertika collides with two-wheeler while attempting to overtake: Three youths injured in Bhusawal भुसावळ : बल्कर टँकरला ओव्हरटेक करीत असताना भरधाव इर्टीका वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने विद्यार्थ्यासह तिघे जखमी झाले. हा अपघात फेकरी शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक 53 वरील रेल्वे उड्डाण पुलाखाली गुरुवारी रात्री 11.30 वाजता घडला. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात तालुका पोलिसात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
चारचाकी चालकाविरोधात गुन्हा
तक्रारदार गौरव सुशील गोठवाल (20, लक्ष्मी चौक, भजे गल्ली, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्यासह अन्य दोघे मित्र होंडा शाईन (एम.एच.19 डी.जे.8089) ने वरणगावकडून भुसावळकडे येत असताना भरधाव इर्टीका (एम.एच.18 बी.आर.6288) वरील अज्ञात चालकाने बल्कर वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले तर तिन्ही मित्र जखमी झाले. तपास नाईक योगेश पालवे करीत आहेत.








