कोथळी येथून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


मुक्ताईनगर : श्री क्षेत्र कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिराजवळून अज्ञात चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा शोध सुरू
तक्रारदार सुमित अरुण ढाके (सालबर्डी, ता.मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची दुचाकी (एम.एच.19 डी.बी.9425) जुन्या मुक्ताई मंदिर परीसराच्या आवारात लावण्यात आली होती मात्र चोरट्यांनी गुरुवार, 16 रोजी दिवसभरात संधी साधून दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अशोक निकम करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !