मुक्ताईनगरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
मुक्ताईनगर : शहर व परीसरातून दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे.
पाळत ठेवून चोरीचा संशय
वैद्यकीय प्रतिनिधी कमलेश विठ्ठल जोशी (38, गोंधळी, विवेकानंद नगर, जळगाव) यांनी आपली 45 हजार रुपये किंमतीची होंडा शाईन दुचाकी (एम.एच.19 सी.डी.9452) डॉ.प्रवीण पाचपांडे यांच्या हॉस्पीटलसमोर उभी केली असता शुक्रवारी दुपारी दिड ते दोन वाजेच्यादरम्यान चोरट्यांनी दुचाकी लांबवली. याबाबत जोशी यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक उमेश महाजन करीत आहेत.








