मांंडूळ सापाची तस्करी : मुक्ताईनगरात चौघा आरोपींना बेड्या
मुक्ताईनगर : मांडूळ सापाची तस्करी करताना वनविभागाने केलेल्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली. विजयसींग मोरसींग राठोड, योगेश फुलसींग राठोड, शांताराम बळीराम राठोड, रुपेश मदन राठोड (सर्व रा.मोरझिरा ता., मुक्ताईनगर अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
वनपरीक्षेत्र मुक्ताईनगर व गस्तीपथक स्टाफ जळगाव यांना मांडूळ सर्पाच्या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगर येथील बर्हाणपूर रस्त्यावरील रामभाऊ पेट्रोल पंपासमोर सापळा रचण्यात आला. वनपरीक्षेत्र अधिकारी कृपाली रामदास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चौघा संशयीतांना अटक करण्यात आली.








