बडनेरा-भुसावळ सेक्शनची रेल्वे महाव्यवस्थापकांकडून पाहणी
Inspection of Badnera-Bhusawal section by Railway General Manager भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी भुसावळ विभागातील बडनेरा-भुसावळ सेक्शनची सोमवारी पाहणी केली. अमरावती येथील नवीन लिफ्ट आणि स्थानक परीसराची पाहणी करुन कोच रेस्टॉरंटलाही भेट देण्यात आली. अमरावती-बडनेरा विभागावरील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची त्यांनी पाहणी करीत नव्याने बांधण्यात आलेला फूट ओव्हर ब्रिज, रुट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) कॅबीन, नवीन अपघात निवारण ट्रेन (एआरटी) शेड, रेल्वे कॉलनी, हेल्थ युनिट, गुड्स शेड, रनिंग रूम, नवीन योग हॉल आणि मेडिटेशन रूम, आरपीएफ ठाणे, कर्मचार्यांची पाहणी केली.
विविध विभागांची केली पाहणी
बडनेरा येथे स्टेशन परीसरासह लॉबी. बडनेरा-टाकळी-कुरम सेक्शनवर हायस्पीड रन, कुरम-माना सेक्शनवरील पुलाची पाहणी, मुर्तीजापूर-काटेपूर्णा सेक्शनवरील वक्र आणि लेव्हल क्रॉसिंग गेटची पाहणीही करण्यात आली. बोरगाव येथील सुरक्षा व राजभाषा प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. महाव्यवस्थापकांनी अकोला यार्ड येथील ट्रॅक्शन सब स्टेशन (टीएसस), गँग आणि स्विच एक्स्पेन्शन जॉइंट पॉइंटची पाहणी केली. त्यांनी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, कोच रेस्टॉरंट, नवीन लिफ्ट्स, रीअल टाइम मॉनिटरिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग लर्निंग सेंटर आणि अकोला येथील स्थानक परिसराचीही पाहणी केली. अकोला-गायगाव-पारस-एसकेनागजिहारी सेक्शनवर हायस्पीड रन, मलकापूर-वडाळी सेक्शनवरील रोलिंग स्टॉक सिस्टीमची (ओआरएमएस) ऑनलाइन मॉनिटरिंगची तपासणी, मलकापूर-कोदुमुडी सेक्शनवरील टीएसएसची तपासणी, मर्यादित उंचीच्या सबवेची (एलएचएस) तपासणी खमखेड-बोदवड विभागावरही तपासणी करण्यात आली. यावेळी भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एस.केडिया, विभाग प्रमुख व भुसावळ विभागातील शाखा अधिकारी उपस्थित होते.








