भुसावळता नुपूर महोत्सवात श्रोते मंत्रमुग्ध


भुसावळ : नुपूर कथक डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने हाशिवरात्रीनिमित्त नुपूर महोत्सवाचे आयोजन डॉ.बी.व्ही. खाचणेे हॉलमध्ये शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. शहरातील डॉ.बी.व्ही.खाचणे हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. यंदा महोत्सवाचे 26 वे वर्ष होते. यंदा कथक आणि भरतनाट्यम हे नृत्यप्रकार सादर झाले. उद्घाटन झुंझार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे विनायक पाचपांडे, ज्येष्ठ छायाचित्रकार अभिराम मेहेंदळे, स्नेहयात्री प्रतिष्ठानचे विरेंद्र पाटील, नृत्यशिक्षीका चारू भालेराव, नुपूर अ‍ॅकेडमीचे संचालक रमाकांत भालेराव यांच्याहस्ते नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

भरतनाट्यम कलाकाराचा सन्मान
सीमा चिव्हाने (रंगभूषा), राकेश भावसार, ज्योत्स्ना कुलकर्णी, ऋतिक वानखेडे, मालती श्रीखंडे, सुरेखा पांडव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमाकांत भालेराव यांनी नुपूर अ‍ॅकॅडमीच्या विविध उपक्रमांची माहिती सविस्तर दिली. भरतनाट्यम कलाकार ऋषिकेश पोहनकर (नागपूर) यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र नृत्यश्री पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. या नंतर प्रत्यक्ष सादरीकरणात सुरुवात झाली. यात प्रथम नुपूर भालेराव हिने गणेश वंदना सादर केली. नटराज स्तुती अवनी धाडसे, तनिष्का पाटील, भार्गवी उंबरकर, गिरीजा सांवदेकर, महिता सुरी, अक्षता जाधव, दानवी पाटील, अनाया भावे तर नीलम, सीमा पाठक, हेमांगी पांडागरे, वैष्णवी बोरसे, लतिका श्रीखंडे, किंजल बार्हे, स्वराली सपकाळे यांनी कथक नृत्यातून तीन ताल सादर केला. या नंतर चंद्रजा इंगळे, हृदया सोनवणे, गार्गी पुसतकर, यामिनी शिंपी, मनिषिका आयुशी यांनी शिवशडाक्ष स्तोत्र सादर केले. या नंतर हिमांशू जावळे याने तराना हा नृत्यप्रकार सादर केला. नंतर नुपूर भालेराव, मनस्वी नागोरी, मानवी नारखेडे, वृषाली लांडगे, कनिका नेमाडे यांनी तराणा सादर केला. नंतर हेमांगी पांडागरे, स्वराली सपकाळे, किंजल बार्हे, लतिका श्रीखंडे यांनी संस्कृत गाण्यावर कथक सादरीकरणाने दाद मिळवली. या नंतर नृत्यशिक्षिका चारू भालेराव यांनी शिववंदना सादर केली. सीमा पाठक, निलम, मानसी भवते, लतिका श्रीखंडे, किंजल बार्हे यांनी शंकर डमरू या गाण्यावर कथक सादर केले. यानंतर नागपूर येथील ऋषिकेश पोहनकर यांनी भरतनाट्यम सादर केले. त्यांनी सादर केलेल्या नांदी चोल या प्रकाराला रसिकांनी भरभरून दाद दिली.कार्यक्रमाच्या शेवटी रासिका भावे व चारू भालेराव यांच्या सोबत सर्व सहभागी कलावंतांनी नर्मदाश्टक सादर करून उस्फूर्त प्रतिसाद मिळवला. राकेश भावसार यांनी सूत्रसंचालन केले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिमांशू जावळे, प्रांजल कुळकर्णी, प्रकाश फेगडे, उमेश जोशी, किशोर चिंचोले, सी.के.पाटील, ऋतिक वानखेडे, झुंझार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !