हॉलिडे एक्सप्रेसमध्ये एकाचवेळी तीन चोर्‍या : 41 हजारांचा ऐवज चोरीला


Three simultaneous thefts in Holiday Express : 41 thousand stolen भुसावळ : रेल्वे गाड्यांमधील वाढत्या चोर्‍यांमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. कानपूर सेंट्रल एलटीडी हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसमध्येही एकाचवेळी तीन चोर्‍या झाल्याची बाब समोर आली असून या घटनेत 40 हजार 999 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली.

एकाचवेळी तीन चोर्‍यांमुळे खळबळ
प्रवासी हतीब शब्बीर खान (रा. मुब्रा) हे हॉलिडे एक्स्प्रेसच्या एस-5 या डब्यातील 43 नंबरच्या सीटवरून फत्तेहपूर ते कुर्ला असा प्रवास करीत असताना ते झोपल्याची संधी साधत चोरट्याने त्यांचा 11 हजार 499 रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला. हा गुन्हा भुसावळहून जबलपूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग झाला. या गाडीतील सिध्दार्थ जयस्वाल हे बोगी क्रमांक एस -6 चया सीट नंबर 33 व 36 वरून प्रवास करीत असतांना त्यांची अडीच हजारांची रोकड असलेली पर्स चोरट्याने झोपेचा फायदा घेत लांबविली. जयस्वाल यांनी येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तो इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करणयात आला. एस – 2 या डब्यातील 65 क्रमांकाच्या बर्थवरून प्रवास करणार्‍या रेहाना शेख इजाज (रा. मुंबई) या झोपल्यानंतर त्यांचा 20 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व सात हजारांची रोकड 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. हा गुन्हा इटारसी लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !