टरबुजांची वाहतूक करणारा ट्रक उलटून क्लीनर ठार : सहा मजुर जखमी
Truck transporting watermelons overturns, cleaner killed : Six laborers injured चोपडा : चोपडा तालुक्यातील वराड शिवारातून टरबूज घेवून शहराकडे निघालेला ट्रक मातीच्या रस्त्यावर उलटून झालेल्या अपघातात क्लीनरचा मृत्यू झाला तर अन्य सहा मजूर जखमी झाले. हा अपघात सोमवार, 20 रोजी घडला. या अपघातात साजीद मोहम्मद बागवान (35, साने गुरुजीनगर, चोपडा) या क्लीनरचा मृत्यू ओढवला तर सहा मजूर गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रस्त्यावर उलटला ट्रक
साजीद महमद बागवान हा अमजद खान तमीझ खान पठाण यांच्या ट्रकवर (एमएच 18 बीए 3486) क्लिनर म्हणून कामास ोता. सोमवारी साजीद बागवान हा चोपडा तालुक्यातील वराड शिवारात टरबूज घेवून निघाल्यानंतर ट्रक मातीच्या रस्त्यावरून स्लिप होऊन उलटल्याने त्या खाली दबले जावून साजीद बागवान हा जागीच मृत झाला तर अन्य सहा मजूर जखमी झाले.






सहा जण जखमी : टरबूजांचे नुकसान
या अपघातात किरण मोरे (17), लताबाई सोनवणे (34), प्रवीण भिल्ल (20), गणेश भिल्ल (16), लताबाई भिल्ल (40, रामपुरा, चोपडा), शफी फारूक बागवान (34, केजीएन कॉलनी, चोपडा) हे मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शेतातील शेतमाल, टरबूजांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकर्याला मोठा फटका बसला आहे.


