जळगावात खुनाच्या प्रयत्नातून निसटलेल्या भुसावळातील आरोपीला कल्याणमध्ये बेड्या


The accused from Bhusawla, who escaped from the attempted murder in Jalgaon, is chained in Kalyan जळगाव : पूर्व वैमनस्यातून मुलाची हत्या झाल्यानंतर आरोपींचा काटा काढण्याच्या उद्देशाने बुरखा घालून आलेल्या पित्याला सतर्क पोलिसांनी अटक केली असलीतरी संशयीतांचा साथीदार मात्र पसार झाला होता मात्र सतर्क सुरक्षा बलाला रेल्वे तपासणीत आरोपीच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. सुरेश रवी इंधाटे (28, पंचशील नगर, बुद्ध विहारामागे, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव असून त्याच्या ताब्यातून चार काडतूस व एक पिस्टल जप्त करण्यात आले आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाच्या परीसरातून काढला पळ मात्र कल्याणमध्ये आवळल्या मुसक्या
भुसावळातील धम्मप्रिय सुरडकर या तरुणाची 21 सप्टेंबर 2021 रोजी जळगाव कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर नशिराबाद उड्डाणपुलाखाली गोळीबार करून तसेच चाकूचे वार करून हत्या केली होती. धम्मप्रियदेखील एका अल्पवयीन तरुणाच्या हत्येचा आरोप होता. नशिराबाद येथे मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर आरोपींचा काटा काढण्यासाठी त्याचे वडिल मनोहर आत्माराम सुरडकर यांनी सुरेश रवी इंधाटे (दोन्ही रा.भुसावळ) यास सोबत घेत जळगाव न्यायालयाबाहेर सापळा रचला होता मात्र यंत्रणेला आरोपींनी घातलेल्या बुरख्याचा संशय आल्यानंतर सुरडकर यांना अटक करण्यात आली मात्र सुरेश इंधाटे पसार झाला होता. इंधाटे हा मंगला एक्सप्रेसमधून मुंबईकडे निघाला मात्र कल्याण आरपीएफचे पथक मंगळवारी पहाटे कल्याण येथे प्रवाशांच्या बॅगेची तपासणी करीत असतानाच एका बोगीत इंधाटे याच्या बॅगेत चार काडतूस व एक पिस्टल आढळल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. आरपीएफ जवानांनी यास कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासानंतर जळगाव शहर पोलिसांकडून संशयीताला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक करणार आहेत.







मनोहर सुरडकर यांची प्रकृती खालावली
जळगाव न्यायालयाच्या आवारातून मनोहर आत्माराम सुरडकर यांना पकडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा बीपी प्रचंड वाढल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सामान्य झाल्यानंतर त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !