यावल शहरात 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या
A 35-year-old youth committed suicide in Yawal city यावल : शहरात शिवाजी नगरातील रहिवासी 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शिवाजी शामराव गाढे (35) असे मयत तरुणाचे नाव आहे.






आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शिवाजी हा तरुण विविध लग्न समारंभात फेटे बांधण्याचे काम करीत होता. मंगळवारी त्याची पत्नी शेतात कामाला गेल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांना माहिती देण्यात आली व मयत शिवाजी गाढे याचा मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. या प्रकरणी यावल पोलिसात अशोक गाढे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे. शिवाजी गाढे या तरुणाच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुल असे परीवार आहे.


