भुसावळात किरकोळ कारणावरून दाम्पत्यास मारहाण : चौघांविरोधात गुन्हा
भुसावळ : शहरात अष्टभूजा मंदिरामागील परीसरात दाम्पत्यास किरकोळ कारणावरून शेजारच्यांनी शिविगाळ करीत मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
प्रीती गिरधारी हेडा (दगुबाई भवन, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या तक्राररुसार, संशयित आरोपींना मोटारसायकल पार्किंग करण्याच्या ठिकाणी ट्यूबलाईटचे तुकडे का टाकले? असे विचारल्याचा राग येवून त्यांनी शिविगाळ करीत मारहाण केली तसेच त्यांचे पती गिरधारी हेडा यांना वीट मारून फेकली व पुन्हा दुचाकी लावल्यास ठार मारू, अशी धमकीही दिली. या प्रकरणी भरत अनिल चौधरी, अनिल डिगंबर चौधरी, कल्पना अनिल चौधरी (अष्टभूजा मंदिरामागे, भुसावळ) व हर्षला उज्ज्वल खाचणे (थेरगाव, पुणे, ह.मु.अष्टभूजा मंदिरामागे, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.








