मुलीच झाल्याने ढोरमाळ येथील विवाहितेचा छळ : पतीसह सात संशयीतांविरोधात गुन्हा


Harassment of a married woman in Dhormal for being a girl: Case against seven suspects including husband मुक्ताईनगर : मुलीच झाल्यानेच ढोरमाळ येथील माहेर व मुंबई येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा
अनिता राहुल निकम (27, ढोरमाळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, मुलीच झाल्याने तसेच माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने सासरच्यांनी छळ करीत शिविगाळ केली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पती राहुल रामदास निकम, सासु समपडाबाई रामदास निकम, जेठ दिनेश रामदास निकम, माम सासरा जीवन देवचंद इंगळे, मावस सासू शोभा जाधवराव तायडे, नणंद भाऊ दिलीप पुंजाजी सुरळकर, दीर संकल्प रामदास निकम (सर्व रा.मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !