भुसावळात परवानगीविना लावलेले बॅनर पालिकेकडून जप्त


Banners put up without permission in Bhusawal confiscated by the municipality भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर परवानगीविना बॅनर लावण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पालिकेच्या पथकाने पोलिसांच्या सूचनेनंतर ही बॅनर जप्त करीत संबंधितांना समज दिली आहे. वर्दळीच्या जामनेर रस्त्यावर वाढदिवसाचे बॅनर लागल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी यांनी पालिका प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर परवानगीची संबंधिताना विचारणा करण्यात आली मात्र संबंधिताकडे कुठलीही परवानगी नसल्याने हे बॅनर पालिकेच्या पथकाने जप्त केले. या कारवाईने मात्र विनापरवानगी बॅनर लावणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.

पालिकेच्या पथकाकडून बॅनर जप्त
शहरात विनापरवानगी बॅनर लावले जात असल्याचे प्रकार नवीन नाही मात्र वर्दळीच्या रस्त्यावर लावण्यात येत असलेल्या या बॅनरमुळे वाहनधारकांचे लक्ष विचलीत होण्याचे प्रकारही घडतात. बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना हा प्रकार आढळल्यानंतर त्यांनी सोमवारी दुपारी पालिकेला सूचित केल्यानंतर पथकाने धाव घेतली मात्र संबंधिताकडे बॅनरची परवानगी नसल्याने तातडीने हे बॅनर्स जप्त करण्यात आले. पालिका लिपिक अनिल भाकरे, गोपाळ पाली, रामदास भोई, अजय विणीवाले, धर्मेद्र खरारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !