भुसावळात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात मोर्चा

केंद्राच्या दबावात निवडणूक आयोगाचे काम : ठाकरे गटासह वंचित आघाडीचा आरोप


March against Election Commission’s decision in Bhusawal भुसावळ : राज्यातील सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. केंद्र शासनाच्या दबावानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचा आरोप करीत भुसाळातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटासह वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे यावल रोडवरील गांधी पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय असा मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा असल्याचा त्याचा निषेध करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे. मोर्चेकर्‍यांनी हातात भगवी झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी केली.

यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, विधान सभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन, विधानसभा क्षेत्र संघटक बबलू बर्‍हाटे, तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, शहराध्यक्ष हेमंत खंबायत, वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, अ‍ॅड.कैलास लोखंडे, सोनी ठाकूर, पिंटू भोई, राजेद्र इंगळे, रहिम गवळी, मनोज पवार, महिला आघाडीच्या योगिता सोनार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, बालाजी पठाडे, प्रकाश सोनवणे, मिरा वानखेडे, गणेश इंगळे, गणेश जाधव, देवदत्त मकासरे, स्वप्निल सोनवणे, बंटी सोनकांबळे, भारती इंगळे, संगीता बिर्‍हाडे आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !