चंदन तस्करी चाळीसगाव वनविभागाच्या जाळ्यात


चाळीसगाव : पाच किलो चंदन लाकडासह दोघांना चाळीसगाव तालुक्यातील बोढरा नियतक्षेत्र परीसरातून वनविभागाच्या पथकाने कारवाई करीत अटक केली आहे. संशयीतांना न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सलमान खॉ. अबरार खॉ पठाण (32) आणि शाबीर खॉ अजमेर खॉ पठाण (24, दोन्ही रा.कुंजखेडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील बोढरा येथील वनपाल व वनरक्षक हे बोढरा जंगली गस्तीवर असतांना दोन जण जातांना आढळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असतांन त्यांच्या जवळील पिशवीत 5 किलो 150 ग्रॅम वजाने चंदनाचे लाकूड, लोखंडी कुर्‍हाड, लहान लोखंडी करवत आणि दोन मोबाईल दिसून आले. त्यांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हा प्रकार घडल्यानंतर दोघांना वन पथकाने अटक केली. तर सोबत असलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयीतांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयात दोघांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली

यांनी केली कारवाई
वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक अजय महिरे, अमित पाटील, रहिम तडवी, प्रसाद कुळकर्णी, अशोक मोरे, उमेश सोनवणे, बापू अगोणे, लालचंद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास वनपाल डी.के.जाधव करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !