जामनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवले


जामनेर : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेण्यात आल्याची घटना जामनेर तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी बुधवार, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी जामनेर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 10 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना संशयित बबलू दरबार भिल (रा.चिर्‍यामुड्या, ता.चैनपूर, जि.खरगोन) याने फूस लावून तरुणीला पळवून नेले. बुधवारी संशयित आरोपी बबलू दरबार भिल याच्या विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !