सावद्यात दोन गटात तुंबळ हाणामारी : पोलिस उपनिरीक्षकास मारहाण ; दोघांना अटक


Clash between two groups in Savada : Police Sub Inspector Assaulted; Both Were Arrested सावदा :  शहरातील बडा आखाडा, रविवार पेठ भागात दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू असल्याची माहिती सावदा पोलिसांना कळताच पोलिसांनी धाव घेतली मात्र संशयितांनी पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल असून दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

चौघांविरोधात गुन्हा
पोलिस कर्मचारी मोहसीन खान शब्बीर खान पठाण यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी दुपारी 4.30 वाजे दरम्यान बडा आखाडा, रविवार पेठ परीसरात संशयित शेख साबीर उर्फ बडा बाबू शेख मंजूर, शेख गुलाब शेख मंजू (दोन्ही रा.बडा आखाडा, सावदा), रीतेश संतोष पाटील, उल्हास कडू पाटील (सावदा) व दोन्हीकडील 7 ते 8 संशयित हाणामारी करीत असल्याने पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना तुम्हीमध्ये पडू नका, असे म्हणत पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्या उजव्या हातावर मारहाण केली व सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचे आवाहानास न जुमानता मारामारी केल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी शेख साबीर उर्फ बडा बाबू शेख मंजूर, उल्हास कडू पाटील यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास सहा.निरीक्षक जालिंदर पळे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !