अकोल्यातील महिलेचे बसमधून सव्वा लाखांचे दागिने चोरीला : पाचोर्यात उघडकीस आली घटना
Jewelery worth half a lakh stolen from bus of woman in Akola: incident revealed in Pachora पाचोरा : अकोला येथील रहिवासी असलेल्या महिलेचे बस प्रवसात चोरट्यांनी एक लाख 30 हजारांचे दागिने लांबवले. पाचोरा शहरातील बस स्टॅण्ड ते एम.एम.कॉलेज चौकादरम्यान गुरुवारी दुपारी 12.45 ते 1.20 वाजेच्या सुमारास पाचोरा-धुळे बसमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
बसमध्ये दागिणे लांबवल्याचा संशय
मनिषा प्रशांत पाटील (33, दाबकी रोड, अकोला) यांचे माहेर वाडीशेवाळे, ता.पाचोरा येथील आहे. विवाहिता कामानिमित्त शहरात आल्यानंतर पाचोरा-धुळे बसद्वारे प्रवास करीत असताना बस स्टॅण्ड ते एम.एम.कॉलेज चौकादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून एक लाख 30 हजारांचे दागिणे लांबवले. गुरुवारी दुपारी 12.45 ते 1.20 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी पर्समधील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची गळ्यातील माळ, 50 हजार रुपये किंमतीची अडीच तोळ्याची सोन्याची चैन व 10 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातील कर्णफुले लांबवली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.फौजदार विनोद शिंदे हे करीत आहेत.








