नाशिक हादरले : पत्नीची गळा चिरून केली हत्या नंतर पतीचीही आत्महत्या
Nashik shook : Wife’s throat slit, then husband’s suicide नाशिक : पत्नीच्या चारीत्र्याच्या संशयातून हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली. अंबड चुंचाळे घरकुल योजनेतील घरात ही घटना उघडकीस आली. मनीषा भूजंग तायडे (30) व भूजंग तायडे (35) अशी मृतांची नावे आहेत.
नाशिकमध्ये उडाली खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे घरकुल येथील इमारत क्रमांक 19 मध्ये दुसर्या मजल्यावर भुजंग तायडे (वय 35) हा कुटुंबासमवेत वास्तव्यास होता. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या मानेवर चाकूने वार करीत तिची हत्या करण्यात आली व नंतर स्वतः भुजंग याने स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुले क्लासवरून घरी आल्याने त्यांनी आई-वडिलांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. परंतु, आतून कोणीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजारच्यांना सांगितले. त्यामुळे शेजार्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी पती भुजंग व पत्नी मनीषा या दोघांचेही मोबाईल ताब्यात घेतले असून, या मोबाइलच्या आधारे पोलिस पुढील तपास करीत आहेत.








