भुसावळ तालुका हद्दीत वॉश आऊट : सव्वा लाखांचे गाठीचे रसायन नष्ट
तिघांविरोधात गुन्हा : पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाच्या कारवाईने खळबळ
Wash out in Bhusawal taluka limits: Chemicals worth half a lakh of bales destroyed भुसावळ : भुसावळ तालुक्यातील शिरपूर-कन्हाळा गावाजवळील नाल्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या दारूच्या भट्ट्या सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी पहाटे पथकाने तीन ठिकाणी छापेमारी करीत सुमारे सव्वा लाखांचे गावठीचे रसायन नष्ट करीत तिघांना अटक करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईने अवैधरीत्या दारू गाळणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
शिरपूर-कन्हाळा गावाच्या नाल्याखाली गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास यासीन सत्तार पिंजारी, रमण सुरळकर, संकेत झांबरे तसेच आरसीपीचे सागर गायकवाड, संदीप भटु सोनवणे, गोपाळ पाटील, सोमनाथ आगोणे, ललित जाधव आदींच्या पथकाने धाव घेत छापेमारी केली. यावेळी संशयीत चुल्यावर हातभट्टीचे रसायन तयार करीत असल्याचे दिसून आल्यानंतर पथकाने जुुम्मा पीरु गवळी (40), युनूस हसन गवळी (38), सुभान तुकडु गवळी (45, सर्व रा.शिरपुर कन्हाळा) यांना ताब्यात घेतले. पथकाने ेच तीन हजार 600 लिटर गुळ, मोह, नवसागर मिश्रीत कच्चे रसायन जागीच नष्ट केले तसेच आठ हजार शंभर रुपये किंमतीचे 35 लिटर तयार गावठी दारु मिळून एक लाख 16 हजार 100 रुपयांचे रसायन जागीच नष्ट करण्यात आले. तीनही संशयीतांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात नाईक यासीन सत्तार पिंजारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.








