यावल-कोळवद रस्त्यावर दुचाकी घसरली : लग्नाला आलेले दोघे वर्हाडी जखमी
Two-wheeler fell on Yaval-Kolvad road : Two wedding guests injured यावल : यावल कोळवद रस्त्यावर दुचाकी घसरल्याने दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने नागरीकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उपचाराअंती त्यांची प्रकृती स्थिर आहे.
उपचारानंतर प्रकृती स्थिर
कोळवद, ता.यावल गावात लग्न समारंभाकरीता नारायण सदन पाटील (65) व नारायण काशीनाथ पाटील (58 , कल्याणे खुर्द, ता.धरणगाव) हे दुचाकीद्वारे आले होते. लग्न समारंभ आटोपून ते धरणगाव जाण्यासाठी निघाल्यानंतर यावल-कोळवद रस्त्यावर यावल शहराबाहेर वळणावर अचानक त्यांची दुचाकी घसरल्याने दोन्ही जण जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपरीचारीका मंजुषा कोळेकर, संजय जेधे आदींनी त्यांच्यावर उपचार केले.


