दहिगावच्या तरुणीचा एकतर्फी प्रेमानंतर विनयभंग : विवाहही मोडला ; तरुणाविरोधात गुन्हा
Dahigaon Girl molested after one-sided love : Marriage also broke ; Crime against youth यावल : तालुक्यातील दहिगाव येथील एका 19 वर्षीय तरुणीचा गावातीलच एका तरुणाने गेल्या सहा महिन्यापासून एकतर्फी प्रेमातून पाठलाग केला. मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्यासोबत लग्न कर असेच सांगून तिला धमकी दिली मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपी तरुणीने तरुणीचे लग्नदेखील मोडले. या प्रकरणी तरुणाविरोधात यावल पोलिसात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नियोजित विवाहदेखील मोडला
दहिगाव गावातील 19 वर्षीय तरुणीने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गावातीलच संशयित हेमंत विजय पाटील हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पाठलाग करीत होता. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर म्हणत लग्नासाठी गळही घातला. तरुणीने या प्रेमसंबंधाला नकार दिला असता या तरूणाने तिला एकतर्फी प्रेमातून मी तुला जिवंत सोडणार नाही व तुझे लग्न होवू देणार नाही, अशी धमकी दिली. तरुणीचा विवाह निश्चित झाल्यानंतर नियोजीत वराशी हेमंत पाटील याने मोबाईलवर संपर्क साधून खोटे बोलून या तरुणीचे लग्न मोडले. या प्रकरणी शुक्रवारी या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून हेमंत विजय पाटील विरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे, राजेंद्र पवार, अनिल साळुंके करीत आहे.

