जळगावातील महापालिका कर्मचार्याची दुचाकी लांबवली
The bike of the municipal employee in Jalgaon was extended जळगाव : शहरातील पांडे चौकातील पोस्ट ऑफिस कार्यालयासमोरून महानगरपालिका कर्मचार्यांची दुचाकी चोरी झाल्याची बाब उघडकीस आली असून जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरींचे सत्र सुरूच
महानगरपालिकेतील कर्मचारी प्रमोद पंडित भारंबे (55, आयोध्या नगर, जळगाव) हे गुरुवार, 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता दुचाकी (एम.एच.19 ए.झेड.1960) ने जळगाव शहरातील पांडे चौकातील पोस्ट ऑफिस टपाल कार्यालयाजवळ आले असता दुचाकी पार्क करीत ते कामानिमित्त गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली.शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्ल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

