निंभोरा गावात धाडसी चोरी : 35 हजारांच्या ऐवजावर डल्ला
Daredevil theft in Nimbhora village: Dalla on compensation of 35 thousand अमळनेर : मध्यरात्री बंद घराची कडी उघडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि देवघरातील चांदीची मूर्ती व शिक्के आदी मिळून 35 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
निंभोरा येथे शेतकरी ज्ञानेश्वर आसाराम पाटील-देसले (55) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शुक्रवार, 24 फेब्रुवारी रोजी पाटील कुटूंब झोपल्यानंतर चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या मागील दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि देव घरातील चांदीचे देव व लक्ष्मी शिक्के असा एकूण 35 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. शनिवारी सकाळी घरफोडी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पाटील यांनी मारवड पोलिसात तक्रार दिल्यानंतर शनिवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील आगोणे करीत आहे.

