काळी कुत्री चावेल म्हटल्याच्या रागातून दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला : पाचोरा तालुक्यातील घटना


Fatal attack on a couple of Vadgaon for a minor reason पाचोरा : काळी कुत्री चावेल, असे आपल्यालाच बोलल्याचा संशय महिलेला झाल्यानंतर दाम्पत्याला सात जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी ही दिली. ही घटना पाचोरा तालुक्यातील वडगाव येथे घडली. या प्रकरणी शनिवार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता पाचोरा पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेला बोलल्याच्या संशयातून झाली मारहाण
युवराज तुकाराम अहिरे (54, रा.वडगाव, ता.पाचोरा) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. युवराज अहिरे हे घरासमोर उभे असताना त्या ठिकाणी एक कुत्री आली व ही काळी कुत्री मला चावेल असे बोलले. शेजरी राहणार्‍या महिलेला वाटले की, काळी कुत्री हे मला बोलले या चुकीच्या संशयावरून अर्जुन देवमन अहिरे, संगीता अर्जुन अहिरे, बारकू रामभाऊ अहिरे, माया रामभाऊ अहिरे, सोनुबाई बारकू अहिरे, विजय जगन अहिरे आणि शोभा जगन अहिरे (सर्व रा. वडगाव ता. पाचोरा) यांनी युवराज अहिरे व त्याच्या पत्नीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच एकाने हातातील विळा युवराज यांच्या अंगावर मारून फेकला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

सात संशयीतांविरोधात गुन्हा
हा प्रकार 20 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ ते 23 फेब्रुवारीच्या रात्री नऊ वाजता घडल्यानंतर युवराज अहिरे यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिल्यावरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !