तलवारीच्या धाकावर दहशत : उत्राण गावातील आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
तलवारीच्या धाकावर दहशत : उत्राण गावातील आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Terror at the point of Sword : Accused from Utran village in the net of Jalgaon Crime Branch जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गावात हातात तलवार घेवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी भिकन रमेश कोळी (उत्राण, ता.एरंडोल) यास अटक करण्यात आली. रविवार, 26 फेब्रुवारी रोजी जळगाव गुन्हे शाखेने कारवाई करीत संशयीताला कासोदा पोलीसांच्या ताब्यात दिले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एरंडोल तालुक्यातील उत्राण गावातील जी.के. फिटनेस क्लब येथे संशयित आरोपी भिकन कोळी हा बेकायदेशीरपणे तलवार ठेवून नागरीकांमध्ये दहशत माजवित असल्याची गोपनी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल्यानंतर पथकाला त्यांनी कारवाईचे निदेश दिले होते. पोलिस उपनिरीक्षक रमेश देवढे, हवालदार लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांनी रविवारी संशयीतावर कारवाई करीत तलवार जप्त करीत त्यास कासोदा पोलिसांच्या ताब्यात दिले.

