किरकोळ वादातून धरणगाव तालुक्यात दोन गट भिडले : परस्परविरोधी गुन्हे


Two factions clashed in Dharangaon taluka over a minor dispute: conflicting crimes पाळधी : येथून जवळच असलेल्या चांदसर गावात दोन गटात किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी घडल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.

परस्परविरोधी तक्रारी दाखल
पहिली फिर्याद भाईदास माधवराव शिंदे (42, चांदसर) यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, संशयित साहिल आयुब पठाण, अयुब बाबन पठाण (दोघ.रा. चांदसर ता. धरणगाव) यांनी तुमची कोळीवाडा भागातील घरामध्ये भरलेली कपाशी खाली करून घ्या, माझ्या आई-वडिलांना कपाशीचे रात्रभर किडे चावतात त्यामुळे त्यांना रात्रभर झोप येत नाही. तक्रारदाराने कापाशीला भाव आला की, विकून टाकु असे बोलल्याचा दोघांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसर्‍या गटातर्फे आुब पठाण यांनी तक्रार दिली. भाईदास माधवरा शिंदे, मनोहर शिवदास शिंदे (दोन्ही रा.चांदसर, ता. धरणगाव) यांना म्हटले की, तुम्ही माझ्या घराशेजारी कपाशी भरलर आहे. कपाशीमध्ये किरकोडे पडलेले आहेत. कपाशीतील किरकोडे हे आई-वडिल यांना चावल्याने खाज येत असून ते रात्रभर झोपू देत नाही, असे बोलण्याचा त्यांना राग आल्याने दोघा संशयीतांनी शिविगाळ करुन चापटाबुक्कांनी मारहाण करीत आम्ही कपाशी घरातुन काढणार नाही, तुला जे कारयचे ते कर अशी धमकी दिली. दरम्यान, दोन्ही गटांनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारींवरून अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास हवालदार विजय चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !