पिंप्रीखुर्द गावातून चारचाकी लांबवली
Charchaki extended from Pimprikhurd village धरणगाव : तालुक्यातील पिंप्री गावातून चोरट्यांनी चारचाकी स्कॉर्पिओ लांबवली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बखळ जागेतून वाहनाची चोरी
प्रशांत ईश्वरलाल बच्छाव (38) यांच्या मालकीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी (एम.एच. 06 डब्ल्यू. 6201) ही वैशाली राजेंद्र बच्छाव यांच्या बखळ जागेवर लावली असता 25 ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून लांबवली. एक लाख 75 हजार रुपये किंमतीचे वाहन लांबवल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र कोळी हे करीत आहेत.

