जळगावातील विवाहितेचा फोटो सोशल मिडीयावर टाकून बदनामी
Defamation by posting the photo of a married woman in Jalgaon on social media जळगाव : शहरातील एका विवाहितेचा फोटो बनावट खात्याद्वारे इन्टाग्रामवर अपलोड करून महिलेसह तिच्या भावाला शिवीगाळ करून बदनामी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी रविवारी जळगाव सायबर पोलिसात अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनोळखीविरोधात गुन्हा
तक्रारदार 25 वर्षीय तरुण हा जळगाव शहरातील एका भागात पत्नीसह वास्तव्य असून 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी रोजीच्या कालावधीत तरुणाच्या पत्नीचे फोटो अपलोड करून बनावट इंस्टाग्राम खाते तयार करण्यात आले व त्यावरून पत्नीसह तिच्या भावाला अश्लील शिवीगाळ करून बदनामी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणाने रविवारी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

