धावडा डिंकाची अवैध वाहतूक : 45 हजारांच्या मुद्देमालासह आरोपी रावेर वनविभागाच्या जाळ्यात


Illegal transportation of Dhavada gum: Accused in Raver forest department’s net with worth Rs 45,000 रावेर : सातपुडा पर्वतातून डिंकाची अवैध वाहतूक करणार्‍या एकावर वनविभागाने कारवाई करीत 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याने तस्करांच्या गोटात भीती पसरली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
वनसरंक्षक दिगंबर पगार, यावल उपवनसंरक्षक जमीर शेख तसेच यावलचे सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी कर्मचार्‍यांसोबत सापळा रचत मोरव्हाल ते जीन्सी रस्त्यावर दुचाकी (एम.एच.19 डि.जी. 0667) वरून 30 रुपये किंमतीचा 55 किलो वजनाचा धावडा डिंक तसेच 15 हजारांची दुचाकी जप्त केली. संशयित अमीर सुभान तडवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनपाल पाल अरुणा ढेपले, जीन्सी वनरक्षक रमेश भुतेक यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !