रावेरात पुन्हा वनविभागाची कारवाई : 23 हजाराचे अंजनाचे लाकुड जप्त
Action of forest department again in Raver : Anjana wood worth 23 thousand seized Action of forest department again in Ravera: Anjana wood worth 23 thousand seized रावेर : वनविभागाच्या पथकाने शहरातील एका गोदामात छापा टाकून 23 हजारांचे अंजन वृक्षाचे लाकूड जप्त केल्याने तस्करांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वनविभागाने लाकूड तसेच डिंक तस्करांवर कारवाईचा सपाटा लावल्याने तस्करांच्या कंपूत घबराट पसरली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर वनपरीक्षेत अधिकारी अजय बावणे आणि वन कर्मचार्यांनी रावेर शहरातील मदिना कॉलनी, ईदगाह रोडवरील प्लॉट नंबर 16 घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमधून अंजन प्रजातीच्या वृक्षाचे 2 हजार 104 रुपये किेंमतीचे 32 नग तसेच 909 रुपये किंमतीचे अंजनाचे जळावू लाकूड जप्त केले. या प्रकरणी संशयित आरोपी शेख फिरोज अजीज (48, रा.मन्यारवाडा, रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
रावेरचे वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनपाल रवींद्र सोनवणे, अरविंद धोबी, अरुणा ढेपले, वनरक्षक रमेश भुतेकर, लेधा पावरा, राजू बंडल, कल्पना पाटील, आयशा पिंजारी, सविता वाघ, पोलिस कॉन्स्टेबल चैतन्य नारखेडे, विक्रम सिसोदे, वाहन चालक विनोद पाटील, सुनील पाटील, वनमजूर जगराम पवार, राजू तडवी, अरमान तडवी, बाळू राठोड, रुस्तम तडवी यांनी ही कारवाई केली.
