चोरीच्या 40 हजारांच्या मोबाईलसह चोरटा जाळ्यात : चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी
40,000 mobile phone thieves in the network: Chalisgaon city police performance चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोबाईल चोरट्याच्या मुसक्या बांधल्या असून त्याच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचे पाच चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. कुणाल कुंदन पवार (वाघळी, ता.चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहरातील दर्गा परिसरात चोरीचा मोबाईल विक्रीसाठी संशयित येत असल्याची माहिती चाळीसगाव शहरचे निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर तयांनी कारवाईचे पथकाला आदेश दिले होते. संशयित आल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत 40 हजारांचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड, महेंद्र पाटील, राहुल सोनवणे, निलेश पाटील, नरेंद्र चौधरी, विनोद खैरनार, निलेश पाटील, भूषण पाटील, ज्ञानेश्वर गीते आदींच्या पथकाने केली.