नशिराबाद टोलनाक्याजवळ दुचाकींचा अपघात : अनोळखीचा मृत्यू


Two-wheeler accident near Nashirabad toll booth: Unknown killed जळगाव : भरधाव दोन दुचाकींमध्ये समोरा-समोर धडक दिल्यानंतर अनोळखी दुचाकीस्वाराचा मृत्यू ओढवला तर दोघे मित्र जखमी झाले. हा अपघात जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील टोलनाक्याजवळील रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडला. या प्रकरणी सोमवारी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
ज्ञानेश्वर सुरेश कोल्हे (24, शारदा नगर, भुसावळ) हा तरूण 23 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मित्र मोहित किशोर पाटीलसोबत दुचाकी (एम.एच.19 डी.सी.3889) ने भुसावळ शहरात येत असताना अज्ञात दुचाकीस्वार हा दुचाकी (एम.एच.19 बी.एफ.1052) ने विरूध्द दिशेने येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर आल्याने धडक झाली. या अपघातात अनोळखी दुचाकीधारक जागीच ठार झाला तर ज्ञानेश्वर कोल्हे आणि मोहित पाटील हे दोघे जखमी झाले. या अपघात प्रकारणी सोमवारी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार राजेंद्र ठाकरे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !