बुरखा घालून खुनाचा प्रयत्न : भुसावळातील आरोपीला 1 पर्यंत पोलिस कोठडी


Attempted murder by wearing veil : Accused in Bhusawal police custody till 1 MARCH जळगाव : मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भुसावळातील पित्यासह आलेल्या आरोपीला कल्याण पोलिसांच्या ताब्यातून शहर पोलिसांनी घेतल्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सोमवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयित मनोहर आत्माराम सुरडकर (50, भुसावळ) यास न्यायालयात हजर केले असता न्याआर.वाय खंडारे यांनी 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांच्या सतर्कतेने टळली हत्या
भुसावळातील मनोहर आत्माराम सुरडकर यांचा मुलगा धम्मप्रिय याची दोन जणांनी जुन्या वादातून तीक्ष्ण हत्याराने वार करीत हत्या केली होती. खून करणार्‍या संशयीतांना तारखेवर जळगाव न्यायालयात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरडकर यांच्यासह सुरेश इंधाटे (भुसावळ) यांनी बुरखा परीधान करून सापळा रचला होता मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर सुरडकर यांना गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूसांसह पकडण्यात आले होते तर इंधाटे पसार झाला होता. सोमवार, 20 फेब्रुवारी ही कारवाई करण्यात आली होती. सुरडकर यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर सुरूवातीला उपचार करण्यात आले व नंतर त्यांना अटक करण्यात आल्याने न्यायालयाने त्यांना सोमवार, 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !