रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने पाचोरा शहरातील महिलेचा मृत्यू


A woman in Pachora city died after being hit by a running train while crossing the railway tracks पाचोरा : रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेचा धक्का बसल्याने शहरातील 38 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.45 वाजता घडली. या प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रतिभा महेश पाटील (38, संभाजी नगर, पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे.

रेल्वेच्या धक्का लागून मृत्यू
शहरातील संभाजी नगर भागातील रहिवाशी प्रतिभा महेश पाटील (38) या सोमवार, 27 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. 372 / 35-37 दरम्यान रेल्वे लाईन क्रास करत असतांनाच डाऊन रेल्वे लाईन वरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावड ही भुसावळच्या दिशेने जात असतांना प्रतिभा पाटील यांना धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एक्सप्रेसचे लोको पायलट यांनी परधाडे रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर यांना वॉकी टॉकीद्वारे कळविल्यानंतर पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्यासह दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. चाळीसगाव लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे एएसआय किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार हे अधिक तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !