मांडवे खुर्दला नाचण्यावरून तरुणाला मारला चाकू
Mandve Khurdala stabbed a young man for dancing जामनेर : जामनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे लग्नात नाचण्याच्या कारणावरून तरुणाला शिविगाळ करण्यात आली व चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. सोमवारी या प्रकरणी पहूर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नाचण्यावरून कारणावरून तरुणावर चाकूहल्ला
हानीफ चिंधू तडवी (40, मांडवे खुर्द, ता.जामनेर) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 25 फेब्रुवारी रोजी मांडवे गावात लग्न कार्य होते. या लग्नात नाचण्याच्या कारणावरून याला गावातील संशयित अनिस मस्तान तडवी याने हानीफ तडवी यांचा मुलगा समीर तडवी याला शिवीगाळ करूण धक्काबुक्की केली व हातातील चाकूने छातीवर वार करून गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर समीरला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत सोमवार, 27 फेब्रुवारी रोजी पहूर पोलिसात संशयित आरोपी अनिस तडवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

