Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia finally resigned दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा अखेर राजीनामा


Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia finally resigned दिल्ली : दिल्लीतील आप सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळ्यात रविवारी सीबीआयने अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविधांगी चर्चा सुरू असतानाच सिसोदीया यांच्यासह सत्येंद्र जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तो मंजूर केला आहे.

आठ विभागांचा सिसोदीया यांच्याकडे पदभार
सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री होते. याशिवाय अबकारी खातेही त्यांच्याकडे होते. सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारचे एकूण 8 विभाग होते. त्यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरीकडे अटकेनंतर तब्बल नऊ महिन्यांनी सत्येंद्र जैन यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.



सीबीआय कोठडीत रवानगी
मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने रविवारी सिसोदिया यांना अटक केली. मनीष सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीवरील निर्णय राऊस व्हेन्यू कोर्टाने राखून ठेवला होता. तत्पूर्वी, न्यायालयाने मंगळवारी कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यास नकार दिला. सिसोदिया सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. आम्ही सध्याच्या परीस्थितीत कलम 32 अंतर्गत याचिका विचारात घेण्यास इच्छुक नाही, असं मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने सिसोदिया यांच्या याचिकेवर म्हटले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !