बीसारा लेडीज इक्वलिटी रनच्या टी-शर्टचे भुसावळात अनावरण
महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे : जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार
भुसावळ : बीसारा लेडीज इक्वलिटी रनच्या टी-शर्ट व पदकांचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याहस्ते रविवारी शहरात अनावरण करण्यात आले. आधी महिलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत होता परंतु आता तो काळ नसून त्यांनी आरोग्यासाठी संघर्ष करावा व स्वतःसाठी वेळ द्यावा असा सल्ला, याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सौभाग्यवती रम्या कन्नन, उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, स्पर्धेचे मुख्य प्रायोजक गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील, भेल कंपनीचे प्रतिनिधी रोहित अग्रवाल, हॉटेल मल्हारचे संचालक प्रमोद धनगर, वरीष्ठ रेल्वे अधिकारी जी.आर.अय्यर, विवियन रॉड्रीक्स, स्पर्धेच्या सदिच्छादूत विद्या बेंडाळे, प्रवीण फालक उपस्थित होते.सोमनाथ वाकचौरे यांनी या रनसाठी पोलिस प्रशासनाची तयारी पूर्णत्वास असून धावपटूंसाठी दीड तास रस्त्याची एक बाजू पूर्णपणे मोकळी असेल, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील तर आभार डॉ.चारुलता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रवीण वारके, डॉ.वर्षा वाडिले, प्रशांत वंजारी, प्रदीप माळी यांनी परीश्रम घेतले.

