जळगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण


जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञाताविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी ही तिच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. सोमवार, 27 फेब्रुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरात दिसून आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून आली नाही. याबाबत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी तीन दिवसानंतर मंगळवारी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !