जळगावातील माजी महापौर ललित कोल्हेंसह सहा जणांविरूध्द गुन्हा
गर्दी जमवून आदेशाचे उल्लंघण भोवले : राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
Case against six people including former mayor of Jalgaon Lalit Kolhen जळगाव : वेतनवाढ मान्य नसल्यामुळे रेमंड कंपनीमधील काही कामगारांनी संप पुकारला आहे. त्यामुळे कंपनीचे कामकाज 24 तारखेपासून बंद असून कंपनीच्या 50 मीटरच्या आवारात कुणीही गर्दी करू नये, असे औद्योगिक न्यायालयाचे आदेश असतानाही खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष व माजी महापौर ललित कोल्हे व यांच्यासह पाच ते सहा जणांनी रेमंड कंपनी परीसरात गर्दी केल्याने आदेशाचे उल्लंघण झाल्याने मंगळवारी रात्री 11.30 वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीचे प्रभारी मुख्य प्रबंधक प्रफुल्ल दत्तात्रय गोडसे यांनी फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ललित कोल्हे व पाच ते सहा जण मंगळवारी दुपारी एक वाजता रेमंड कंपनीच्या 50 मीटरच्या आत येवून कामबंद आंदोलनाबाबत प्रसार माध्यमांना माहिती देत होत. या संदर्भात सिक्युरीटी इन्चार्ज गिरधारी कुर्वे यांनी गोडसे यांना कळविले. त्यानंतर कुर्वे यांनी कोल्हे यांना समजावून सांगून कंपनीच्या 50 मीटर बाहेर जाण्यास सांगितले. त्यावर आपण कुठलेही आंदोलन करत नसल्याचे सांगत कोल्हे व इतर लोक 50 मीटरच्या आतच थांबून राहिले. हा प्रकार कुर्वे यांनी गोडसे यांना कळविला. त्यानंतर रात्री गोडसे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने कोल्हेंसह पाच ते सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

