मुक्ताईनगर तालुक्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरूवात


RTE admission process started in Muktainagar taluka मुक्ताईनगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील बालकांना दरवर्षी पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. यंदा जिल्ह्यात 294 शाळांची नोंदणी झाली असून यात तीन हजारांपेक्षा जास्त बालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे. आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा संपली असून 1 मार्चपासून पालकांना आपल्या पाल्यांचे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. त्यासाठी शासनाने 17 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. 17 दिवस ही मुदत देण्यात आली आहे.

11 शाळांमध्ये मिळणार प्रवेश
मुक्ताईनगर तालुक्यातील 11 शाळांमध्ये आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याची माहिती मुक्ताईनगर गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसापासून आरटीई प्रवेशासाठी पालकांची प्रतीक्षा लागुन होती. शासनाने आरटीई प्रवेशासाठी वेळा पत्रक जाहीर केले असून 1 ते 17 मार्च पर्यंत पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. यासाठी उत्पन्नाची मर्यादा एक लाखापर्यंत असणार आहे. यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता पालकांना करावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर एकाच वेळ लॉटरी पध्दतीने सोडत जाहिर होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !