उन्हाळी सुट्ट्यांसाठी काझी पेठ, तिरूपती, नांदेड विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
Increase in duration of Kazi Peth, Tirupati, Nanded special trains for summer vacations भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दादर-काझीपेठ, शिर्डी-साईनगर-तिरूपती, दादरभनांदेड या विशेष गाड्यांना मुदत वाढ मिळाल्यान प्रवाशांची जागेसाठी होणारी गैरसोय आता दूर होणार आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे प्रवाशांची अतिरीक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे. यात रेल्वे प्रशासनाकडून दादर-काझीपेट (07198) ही गाडी 26 फेब्रुवारीऐवजी आता 25 जुनपर्यंत चालविली जाणार आहे. तसेच (07197) काझीपेठ-दादर विशेष गाडी ही 25 फेब्रुवारीऐवजी आता 24 जुनपर्यंत धावणार आहे. दादर काझीपेठ (07196) ही गाडी 23 फेब्रुवारीऐवजी आता 29 जुनपर्यंत धावेल तर काझीपेठ – दादर (07195) ही विशेष गाडी 22 फेब्रुवारीऐवजी आता 28 जुनपर्यंत धावणार आहे. साईनगर शिर्डी-तिरूपती (07638) विशेष गाडी 27 फेब्रुवारी ऐवजी आता 26 जुनपर्यंत धावणार आहे. तिरूपती-साईनगर शिर्डी (07637) ही गाडी 26 फेब्रुवारीऐवजी 25 जुनपर्यंत धावणार आहे.




एलटीटी नांदेड 27 जुनपर्यंत
07427 लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड ही विशेष गाडी 28 फेब्रुवारीऐवजी 27 जुनपर्यत वाढविण्यात आली तर (07426) नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी आता 26 जुनपर्यत चालविली जाणार आहे. तसेच 07429 लोकमान्य टिळक टर्मिनस- नांदेड विशेष गाडी आता 29 जूनपर्यत धावणार आहे. (07428) नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष गाडी सुध्दा 22 फेब्रुवारी ऐवजी 28 जुनपर्यंत धावणार आहे. प्रवाशांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.