एरंडोल तालुक्यातील तरुणीची हळदीच्या दिवशी आत्महत्या


A young woman in Erandol taluka committed suicide on the day of Turmeric एरंडोल : तालुक्यातील टोळी खुर्द येथील गायत्री विजय पवार या तरुणीने हळदीच्या दिवशीच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 27 रोजी घडली. तरुणीच्या वडिलांचेही यापूर्वी निधन झाले असून ती गावात आई,भाऊ, काकांसोबत राहत होती. गायत्रीचे करमाड (ता. पारोळा) येथील तरुणाशी लग्न ठरले होते. 28 रोजी लग्न असल्यामुळे 27 रोजी करमाड येथे हळद लागणार होती. त्यासाठी 27 रोजी सकाळी नवरीला घेण्यासाठी करमाड येथून सकाळी 10 वाजता गाडी आली मात्र लग्नापूर्वीच तरुणाने धक्कादायक पाऊल उचलले.

विहिरीत उडी घेत आत्महत्या
नवर्‍या मुलीस घेऊन जाण्यासाठी घरात पाहुणे आले असता गायत्री मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली. तिला जवखेडा रोडकडे जाताना अनेकांनी पाहिले. नंतर तिच्या मागे कुटुंबीयांनी जाऊन पाहिले असता, वासुदेव कासार यांच्या विहिरीजवळ तिचा मोबाईल आढळला तर विहिरीत तरुणी तरंगताना दिसली. नातेवाईकांनी तिला विहिरीबाहेर काढून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !