यावल वनविभागाची मोठी कारवाई : अवैधरीत्या जळावू लाकडाची वाहतूक रोखली


Big action of Yaval Forest Department: Traffic of illegal firewood was stopped यावल : यावल वनविभागाच्या गस्ती पथकाने मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास केलेल्या कार्यवाहीत 16 हजार रूपये किंमतीच्या जळावू लाकडासह चार लाख रुपये किंमतीचा टाटा आयसर ट्रक जप्त केल्याने अवैध तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास येथील फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या पुढे काही अंतरावर येथील पूर्व वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर व गस्ती पथकाचे वनपरीक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड , वनमजुर अशोक माळी हे पथकासह गस्तीवर असतांना ट्रक (क्रमांक एम.एच. 16 एई 9317) या वाहनातून संशयीत चालक जुम्मा नबाब तडवी (कोरपावली) हा विनापरवाना निम, पापडी प्रजातीचे 16 हजार रुपये किंमतीचे 18 हजार घन मीटर जळाऊ लाकूड वाहतूक करताना आढळला. पथकाने ट्रक चालक जुम्मा नबाब तडवी याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. डोंगरकठोरा वनक्षेत्राचे वनपाल रविद्र तायडे हे तपास करीत आहे. यावल तालुक्यात वृक्षांची तोड करणारा माफीया मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाला असून वृक्षांची कत्तल करून परप्रातांत पाठविण्यात येत आहे. यात वनविभागाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !