भुसावळात सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी 30 उपद्रवींना शहरबंदीचे प्रस्ताव


City ban proposed for 30 miscreants for peaceful celebration of festival in Bhusawal भुसावळ : आगामी सण-उत्सवांच्या काळात शहरात शांतता राहण्यासाठी उपद्रवींना शहर बंदी करावी या संदर्भातील प्रस्ताव पोलिसांनी प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत.

सण-उत्सव शांततेत पार पाडण्याचे नियोजन
शहरात गेल्या दोन वर्षााच्या काळात ज्यांच्या विरूध्द आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झालेले आहे तसेच तीन पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहे, अश्या 30 संशयीतांचे शहरबंदीचे प्रस्ताव पोलिस प्रशासनाकडून तयार करण्यात आले. होळी, धुलीवंदन, शिवजयंती या सण, उत्सवांमध्ये उपद्रवींना शहरात बंदी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आले असून प्रांताधिकार्‍यांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरेंच्या माध्यमातून हे प्रस्ताव सादर झाले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !