भादलीतील मोबाईल चोरटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
Mobile thief in Bhadli caught by District Police जळगाव : जिल्हापेठ पोलिसांनी जबरीने मोबाईल लांबवणार्या भामट्याच्या मुसक्या बांधल्या आहेत. गिरीश रतन कोळी (42, रा.भादली) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोरून जात असलेल्या विद्यार्थ्याचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल लांबवल्याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संशयित निष्पन्न केला.
गुन्हा दाखल होताच आवळल्या मुसक्या
भादली गावातील युगल जगदीश रडे (19) हा विद्यार्थी शिक्षणाकामी जळगाव शहरातील आंबेडकर मार्केट जवळ असलेल्या विवेकानंद नगरात वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या गिरीश रतन कोळी (42) याने युगलचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. या घटनेनंतर युगल रडे याने जिल्हापेठ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येताच संशयीताला अटक करण्यात आली.

