Ashwini Jagtap चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचा डंका : अश्विनी जगताप विजयी
BJP stings in Chinchwad by-election : Ashwini Jagtap wins पुणे : चिंचवड येथे झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला. चिंचवडची पोटनिवडणूक ही जगताप कुटुंबासाठी सोपी नव्हती. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर आधीच मोठं संकट कोसळलेलं होतं. त्यानंतर चिंचवड पोटनिवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे उमेदवारी नेमकी कुणाला दिली जाणार यावरुन तिथे चर्चा होती. अनेक चर्चांनंतर भाजपकडून तिथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली.
गड आला पण सिंह गेला
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजार 91 मतांनी मोठा विजय झाला. त्यांना 37 व्या फेरीनंतर एकूण 1 लाख 35 हजार 434 मतं मिळाले. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना 44 हजार 82 मतं मिळाली. या निवडणुकीनंतर अश्विनी जगताप म्हणाल्या, ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. गड आला, पण सिंह गेला. लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं, त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा गड राखायचा होता. तो गड सर्वांनी राखला आहे.

‘जनतेने विकासाला मत दिलं’
दरम्यान, विजयानंतर अश्विनी जगताप म्हणाल्या की, विजयांचं श्रेय मी सर्व कायर्यकर्ते, भाजप आणि ज्येष्ठ नेत्यांना देईन. सर्वासामान्य कार्यकर्ते यांच्यामुळे मी जिंकून आले. कार्यकर्ते आणि जनतेचं साहेबांवर जे प्रेम होतं तेच प्रेम त्यांनी दाखवून दिलं आहे. एकप्रकारे त्यांनी पावतीच दिलं आहे. त्यांनी विकासाला मत दिलं आहे, असं अश्विनी जगताप म्हणाल्या. सर्वसामान्य लोकांना मी न्याय द्यायचा प्रयत्न करेन. तसेच विकासाची कामे जी राहिली आहेत ती कामे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, असं आश्वासन त्यांनी दिले.
