पैसे पडल्याचे सांगून सव्वा दोन लाखांची रोकड लांबविली : बोदवड तालुक्यातील धक्कादायक घटना


Cash of two and a half lakhs was extended by saying that the money had fallen: a shocking incident in Bodwad taluka बोदवड : पैसे पडल्याचे सांगून वृध्दाच्या दुचाकीला लावलेली दोन लाख 16 हजारांची रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात तीन चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनोळखींचा पोलिसांकडून शोध सुरू
प्रभाकर धर्मा लुटे (59, राजूर, ता.बोदवड) हे शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 1 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ते बोदवड शहराजवळील खंडेलवाल गॅस एजन्सी जवळून दुचाकीने जात असताना रस्त्याने जाणार्‍या अज्ञात तीन भामट्यांनी त्यांना सांगितले की, बाबा तुमचे पैसे पडले आहे, असे सांगितल्याने प्रभाकर लुटे हे थांबले. त्यांच्या मागून अज्ञात दोन व्यक्ती यांनी प्रभाकर यांची नजर चुकवून त्यांच्या दुचाकीला लावलेली दोन लाख 16 हजार रुपये ठेवलेली पिशवी लांबविली. हा प्रकार घडल्यानंतर प्रभाकर लुटे यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी तातडीने बोदवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रमोद तायडे करीत आहे.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !